कर्जत :- रोहित पवार यांच्या ‘सृजन’ या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही स्पर्धा होणार आहे.
18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून 18 तारखेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 14 आणि 17 वयोगटातच्या आतील मल्लांची स्पर्धा होणार आहे.
तर 19 तारखेला भारत विरुद्ध इराण अशा आंतरराष्ट्रीय मल्लांचे सामने होतील तसेच महाराष्ट्रातील नामांकित मल्लही ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सर्व कुस्ती प्रेमींनी हा संदेश जास्तीत जास्त प्रसारित करावा आणि आपल्या सर्व मित्र परिवाराला आमंत्रित करावे. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्ती या रांगड्या खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
- Soybean Crop Variety: खरिप हंगामात सोयाबीनच्या ‘या’ वाणांची लागवड म्हणजे निश्चित पैसा आणि उत्पादनाची हमी! वाचा या वाणांची वैशिष्ट्ये
- Ahmednagar Politics : शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवतेंना वंचितकडून उभे करण्यामागे विखे यांचा हात? राजकीय समीकरणे बदलवण्यासाठी खेळी केली?
- Weight Loss Tips: सकाळी नाश्त्याला न चुकता ‘हे’ पदार्थ खा! वजन,पोट होईल कमी आणि दिसाल फिट
- Ahmednagar Politics : शिर्डीत पुन्हा ट्विस्ट ! लोखंडे-वाकचौरे-विखे-रूपवतेंच्या आखाड्यात आता मनोज जरांगे पाटलांची एंट्री होणार? पहा..
- Salary Hike: कंपनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी होणार कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 12 टक्क्यांपर्यंत वाढ? सर्वेक्षणात माहिती आली समोर