कर्जत :- तालुक्यातील गवंडी गल्लीत घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा धक्का बसून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला.
आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न (वय ७ वर्ष) व जान्हवी(वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला आणि दोघा बहिण- भावाचा जागीच मृत्यू झाला.
साडेसात वाजता मूळचे उत्तर प्रदेशमधील असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते.
त्यानंतर दोघे सोमवारी सायंकाळी घराच्या गच्चीवर खेळायला गेले होते. त्यांची आई घरात स्वयंपाक करीत होती, तर वडील रंगकामासाठी गेले होते.
खेळाता खेळता मुले गच्चीवर गेली. तेथे विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांना धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघेही शेजारील घराच्या पत्र्याच्या छतावर फेकले गेले.
शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिकडे धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- Shani Gochar 2024 : जून महिन्यात शनी चालेले उलटी चाल, ‘या’ 3 राशींवर होईल सर्वाधिक परिणाम, चांगला की वाईट? वाचा…
- अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला ! बिबट्याने अंगावर झेप घेतली आणि…
- Ahmednagar News : दोनशे सीसीटीव्ही तपासले तरी मिळेना ! तिकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला..
- Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न !
- Personality Test : हाताच्या बोटांवरून समजेल भविष्य अन् बरंच काही…दडलेले असतात अनेक रहस्य!