टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती.
निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी पं. स. सदस्य किरण खेडकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष पंढरीनाथ केकाण, सरपंच गयाबाई ढाकणे, माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, दिलीप पवळे, वसंत खेडकर, अंबादास राऊत, अंबादास घुले, मच्छिंद्र पवळे, महारुद्र कीर्तने,
शहादेव ढाकणे, अनिल खेडकर, बाबासाहेब राऊत, सलीम बागवान, विष्णू थोरात, धोंडीराम केळगंद्रे, विठ्ठल ढाकणे, मालेवाडीचे सरपंच पांडुरंग खेडकर, उपसरपंच शहादेव कीर्तने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक ढोले यांनी केले. रवींद्र फुंदे यांनी आभार मानले.
- Salary Hike: कंपनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी होणार कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 12 टक्क्यांपर्यंत वाढ? सर्वेक्षणात माहिती आली समोर
- मारुती सुझुकीची ‘ही’ आहे सर्वाधिक विक्री होणारी 5 सीटर SUV कार! देते 25 किमीचे मायलेज, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
- ACTREC Mumbai Bharti 2024 : ACRTEC मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित, ‘या’ पदांसाठी होत आहे भरती….
- UPSC Bharti 2024 : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती, आताच करा अर्ज, जाणून घ्या…
- मार्केटमध्ये तुमच्या आरोग्याशी खेळ ! रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खवा, कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर…