कराची : पाकिस्तानमध्ये व्हिडिओ गेमवरून झालेल्या भांडणामध्ये एका अल्पवयीन मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
मुहम्मदी कॉलनी जिल्ह्यात राजू आणि शाहझीब इक्बाल या १५ वर्षीय दोन मित्रांमध्ये व्हिडिओ गेमसाठीचे टोकन वापरण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर राजूने इक्बालला बेदम मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इक्बालला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजू व त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणानंतर फरार झालेल्या राजूचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
- LIC policy : LICच्या ‘या’ योजनेत फक्त 45 रुपये गुंतवून कमवा लाखो रुपये, अशा प्रकारे गुंतवणूक…
- Volvo Electric SUV : व्होल्वोच्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV वर मिळत आहे भरघोस सूट, बघा नवीन किंमत!
- Ahmednagar Breaking : विखे-लोखंडेंसाठी पंतपधान मोदी अहमदनगरमध्ये ! ‘या’ तारखेला होणार भव्य सभा
- Samsung Galaxy : सॅमसंगने स्वस्त केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून नवीन किंमत!
- Ahmednagar News : शेवगावमधून तीन शाळकरी मुली पळवल्या, पाच जिल्ह्यात शोधाशोध.. अखेर ‘अशा’ पद्धतीने आरोपीसह मुली सुप्यात सापडल्या