About Us :: Ahmednagar News                                    नमस्कार ! www.ahmednagarlive24.com  या अहमदनगर जिल्ह्याच्या पहिल्या online वृत्तपत्र आणि वेब पोर्टलला भेट दिल्या बद्दल आपले शतशाः आभार अहमदनगर जिल्ह्यात जे जे काही घडते ते इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या अहमदनगरकरांना कळावे हे ध्येय ठेऊन ATS MetroWeb & Media Group तर्फे हे वेब पोर्टल चालू केले आहे

                अचूक बातम्या, घटनेमागची सत्यता, निर्भीड आणि रोखठोक भूमिका हि त्रिसूत्री घेऊन तुमच्यासाठी  अहमदनगर लाइव्ह २४.कॉमच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेत एक आधुनिक पाउल म्हणून .... वेबसाईट, Android App, फेसबुक, WhatsApp ग्रुप, युट्यूब, ट्विटर, आणि SMS च्या द्वारे लोकांना बातम्या, ज्ञान, मनोरंजन, माहिती पुरविण्या बरोबरच वर्षातील ३६५ दिवस अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी आमच्या वाचकाना थेट मोबाईलवर वाचायला मिळणार आहे .

गरज एका आधुनिक बदलाची 

          वेगवान आयुष्यामध्ये निवांतपणे वृतपत्र वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्याएवढा कोणाला वेळ नाही घडणार्‍या बातमीचे अपडेटस् क्षणाक्षणाला आमच्या वाचकाला तो जिथे असेल तिथे, तो जे काम करीत असेल त्यात फारसा व्यत्यय न आणता आम्ही ह्या वेबसाईट च्या माध्यमातून देउ शकतो . आजच्या गतिमान काळात स्वतःला अपडेट ठेवणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपल्या अवतीभवती जगात काय घडते आहे याची नोंद जो ठेवणार नाही तो स्पर्धेच्या या युगात दूर फेकला जाईल.

सिटिझन जर्नलिझम 

              सिटिझन जर्नलिझमचे महत्त्व आजच्या काळात निर्विवादित आहे. युक्रेनमधल्या रशियाच्या आक्रमणाच्या कथा, गाझामधल्या हमासची इस्रायलने उडवून दिलेली त्रेधा, इराकमध्ये कुर्दिस्तानात आयएसआयएसने घातलेले वंशविच्छेदाचे थैमान हे कोणत्याही वृत्तसंस्थेचा वार्ताहर हजर नसला, तरी जगाला कळू शकले हे सोशल मीडियाचे योगदान आहे. एक जागतिक सर्वेक्षण सांगते कि सोशल मीडियावर पंचावन्न टक्के लोक आपल्याला कळलेल्या बातम्या शेअर करतात आणि ४६ टक्के लोक त्यावर चर्चा करतात . हीच स्थिती आपल्या अहमदनगरमध्ये सुद्धा आहे ....  

      

           मित्रानो, ahmednagarlive24.com हे आपणा सर्वासाठी हक्काचे व्यासपीठ आहे कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न बाळगता या न्यूज पोर्टलवर तुम्ही तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, तुमचे लेख ,फोटो ,व्हिडीओ, सामाजिक उपक्रम तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची फक्त माहिती आम्हाला कळवा. अन्यायाला वाचा फोडणे हेच आपले काम आहे. आपण मिळून ते नक्की करू. अट फक्त एकच वार्तांकन करायचे ते पूर्णतः निपक्ष, आणि सत्य परिस्थितीला धरूनच. तुमच्या बातम्या आणि लिखाणाला  ahmednagarlive24.com  वर ठळक प्रसिद्धी मिळेल याची खात्री बाळगा ! टू इन्फॉर्म, टू एज्युकेट अँड टू एंटरटेन  

       ही पत्रकारितेची त्रिसूत्री मानली जाते. वैचारिक लेखन आणि समाजातील विविध प्रश्‍नांवर आग्रही भूमिका घेण्याबरोबरच आजूबाजूला घडते, ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो अशा गोष्टीं, शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्‍न, अडचणी, त्याला आवश्यक त्या गरजा त्याच्या समस्या माध्यमातून जगापुढे याव्यात,आणि त्यावर उपाय योजना व्हाव्यात हा आमचा प्रयत्न असणार आहे ....
तेजस बाळासाहेब शेलार 
संस्थापक संपादक 
अहमदनगर लाइव्ह24.कॉम 
edit.tejasbshelar@gmail.com 
Contact :- +91 9665762303 / +91 9673867375

Powered by Blogger.