अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.

 राठोड यांच्या प्रचारात सहभागी होण्याबाबत कोणतीही निर्णय न घेता येत्या तीन-चार दिवसात माझी भूमिका जाहीर करेल,असे गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विकास योजनांबाबत माहिती देण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी गांधी यांनी योजनांची माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून गांधी व राठोड यांच्यातून विस्तवही जात नाही. राठोड हे सेनेचे उमेदवार असतील तर भाजप वेगळा करेल असा इशारा राठोड यांना दिला होता. तर मागील आठवड्यात राठोड यांनी आले तर त्यांच्यासोबत अन्यथा त्यांच्याविना अशी भूमिका जाहीर केली होती.

मात्र सेनेच्या उमेदवारीची माळ राठोड यांच्या गळ्यातच पडल्याने बाकी भाजपातील सर्व गट त्यांच्या निवडणुकीत सक्रीय झालेले असताना गांधी यांनी मात्र अलिप्तपणाची भूमिका घेतली आहे.गाधी एकीकडे राज्यात व जिल्ह्यात बाकी ठिकाणी भाजप-सेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आव्हान करत असताना शहरात मात्र सेनेच्या उमेदवारालास साथ देण्याचे अजूनतरी त्यांच्या डोक्‍यात दिसत नाही.

Leave a Comment