मुख्यमंत्र्याच्या आदेशाने विखे पाटील संकटात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव – अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे यांना तुमच्या भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचक इशारा दिला आहे.

 भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन  दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात विखेंचे मेहुणेही अपक्ष उभे असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपल्या भाषणात भाची अर्थात भाजप उमेदवार असलेल्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असं आश्वासन दिलं. तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनीही विखे पाटलांना कोल्हे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याची जबाबदारी दिली. 

विखेंनी भाची मागे उभं राहणार असं आश्वासित केलं खरं, मात्र भाजप उमेदवार असलेल्या भाचीला मदत करायची की मेहुण्याला अशा कात्रीत विखे सापडले आहेत.

दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे स्नेहलता कोल्हे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांचे बंधू आहेत.ते भाजपकडून लढण्यास इच्छुक होते परंतु तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष निवडणुक लढवत आहे. 

कोपरगाव विधानसभेत स्नेहलता कोल्हे (भाजप), आशुतोष काळे (राष्ट्रवादी), अशोक विजय गायकवाड (वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत) आणि दोघा अपक्ष उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होत आहे.

Leave a Comment