मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे.
कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय की, ते ऐकून हृतिक देखील शांत बसणार नाही. कंगना म्हणाली की, जर ती हृतिक रोशन असती तर गप्प बसली नसती.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, कंगना एका कार्यक्रमात गेली तेव्हा तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रानौतला विचारलं की, जर तुला एक दिवसाचा हृतिक रोशन केलं तर तू काय करू इच्छिते.
उत्तर देताना कंगना म्हणाले, आमच्या दोघांमध्ये जे काही झालं. किंवा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जे काही केलं त्यानंतर मी हृतिक असती तर कंगनाला फोन केला असता. आणि म्हटलं असतं की, मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी ‘सॉरी’.
- Top Cow Breed In India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या देशी गाईच्या जाती! वाचा वैशिष्ट्ये आणि गाईंची किंमत
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? ‘या’ ठिकाणी ७ दिवसात ३ मृतदेह सापडले
- उन्हाळ्यातील गर्मीत फिरा झारखंडमधील काश्मीर! झारखंड मधील ‘हे’ ठिकाण सिमला आणि मनालीला देखील पाडते फिके
- Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मज्जाच-मज्जा! ‘या’ बँकात एफडी करा पैसे होतील दुप्पट, नावं जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी
- Business Idea: एक लॅपटॉप घ्या आणि रेल्वेसोबत व्यवसाय करा! महिन्याला होईल 50 हजार रुपये कमाई