एक हॉटेल असे ही : पोटभर खा अन् हवे तेवढेच पैसे द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अलबामामध्ये एक अनोखे हॉटेल सुरू झाले असून तिथले ताजे पदार्थ खाण्यासाठी लोकांची रांग लागते. या हॉटेलची खासियत म्हणजे, तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांंची निश्चित किंमत नाही. ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत, तेवढे देऊन तो तिथे जेवण करू शकतो.

ज्या लोकांकडे काहीच पैसे नाहीत, ते जेवणाच्या बदल्यात लोकांना खाद्यपदार्थ वाढून भरपाई करू शकतात. ड्रेक्सेल अँड हनीबी नावाच्या या हॉटेलसमोर दररोज दुपारी भुकेले लोक रांग लावून उभे राहतात. काही लोक तीन वा पाच डॉलर दानपेटीत टाकून निघून जातात.

दुसरीकडे कधीकधी दानपेटीत ५०० व एक हजार डॉलरचेही चेक पडलेले असतात. लोक बऱ्याचदा हॉटेलच्या दरवाजावर घरी बनविलेले ताजे खाद्यपदार्थ ठेवून निघून जातात. या हॉटेलची ६६ वर्षीय मालकिण लिसा मॅकमिलन यांनी सांगितले की, मेनूमध्ये कोणत्याही खाद्यपदार्थाची किंमत लिहिलेली नसते.

लिसा पती फ्रेडीने मार्च २०१८पासून हे भुकेल्यांचे पोट भरणारे हॉटेल सुरू केले होते. जे लोक खाण्याचे पैसे देतात, ते एका डिवाइडरच्या मागे ठेवलेल्या बॉक्समध्ये गुप्त रुपात पैसे टाकतात. पाच डॉलर सर्वात सामान्य दान आहे.

एक वेट्रेस म्हणून आयुष्य घालविणाऱ्या लिसाने सांगितले की, अनेक वृद्धांचा उपासमारीमुळे मृत्यू होतो. कारण त्यांच्यापैकी अनेकांकडे खाण्यासाठी पैसे असले तरी व औषधे घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.

अशा लोकांची भूक भागविण्यासाठी हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. समाजातील लोक व व्यावसायिक अन्न, पैसे व वस्तू दान करून हे हॉटेल चालविण्यासाठी मदत करतात.

Leave a Comment