निलेश गायकर यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले – : ब्राम्हणवाडा विभागाचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांना युवा ध्येय प्रणीत या सामाजिक संस्थेचा यंदाचा सामाजिक कार्यकर्ता व युवा उद्योजक क्षेत्रातील राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार २०१९ जाहीर करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून निलेश गायकर यांनी सामाजिक बंधीलिकीच्या माध्यमातून संगमनेर , अकोले तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे करत आहे.

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर वर्षी विभागातील ग्रामीण भागातील शालेय विध्यार्थाना शालेय साहित्य,क्रीडा साहित्य तसेच वृक्षारोपण माध्यमातून एक हात मदतीचा हा संकल्प जतन करत आहे.

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी स्वतःच्या व्यवसायिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम करता राज्यात मोठी भरारी घेत स्व मालकीची साई एंटरप्राईजेस नावाची आय टी टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर अशी सरकार मान्य आय एस ओ कंपनी सर्व महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत आहे.

या माध्यमातून त्यांनी अनेक मुलांना रोजगार संधी देखील कमी वयात उपलब्ध करून दिलाच त्याचबरोबर ग्रामीण भागात डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी नेहमी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत तो यशस्वी देखील केला आहे.

या सर्व त्यांच्या कार्याची युवा ध्येय सामाजिक संस्था यांनी दखल घेत इंजि.निलेश गायकर यांना अहमदनगर येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते युवा आयडॉल २०१९ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यांच्या या पुरस्काराबद्द्ल राज्याचे माजी मंत्री मधुकररावजी पिचड, आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर तसेच विविध सामाजिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment