नेप्तीत रॉबिन हूड आर्मीने केले गरजूंना अन्न-धान्याचे वाटप

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहमदनगर – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेप्ती (ता. नगर) येथे रॉबिन हूड आर्मीच्या वतीने दुर्बल घटक व वंचित घटकातील गरजू नागरिकांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, मा.सरपंच विठ्ठलराव जपकर, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी पाटील होळकर, सुभाष जपकर, जालिंदर शिंदे, रामदास फुले, राजेंद्र होळकर, बबन कांडेकर, बाळासाहेब होळकर, गोरक्ष फुले, संभाजी गडाख, बाबासाहेब होळकर, नितीन कदम, युवा नेते संजय जपकर, राहुल गवारे, सुरेश कदम, हौशीराम जपकर, चेअरमन रघुनाथ होळकर, संतोष चौरे, गोरख जपकर, विष्णू गुंजाळ, अतुल गवारे, गोरख होळकर, सय्यद सत्तार, अरुण होले, गुलाब सय्यद, बाबा पवार, पोपट मोरे, अशोक वाघ, पंढरीनाथ जपकर आदी उपस्थित होते.


उपसरपंच शिवाजी पाटील होळकर यांच्या हस्ते अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. होळकर म्हणाले की, नेप्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील गावातील गरजू घटकांना मदत पुरविण्याचे कार्य चालू आहे. रॉबिन हूड आर्मीच्या युवकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेला उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. वंचित दीन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्‍वसेवा असल्याचे त्यांनी सांगितले. 


रॉबिन हूड आर्मीचे युवक-युवती शहरात कार्यरत असून, गरजूंना धान्य वाटप करणे तसेच लग्नसमारंभ, हॉटेलमध्ये उरलेले अन्न वंचित घटकांपर्यंन्त पोहचविण्याचे कार्य करीत असल्याची माहिती परेश भाटे यांनी दिली. या उपक्रमासाठी रॉबिन हूड आर्मीचे परेश भाटे, सुहित शेटीया, रुपेश नायर, निकुंज चेडा, भाग्यश्री सोमानी, गौरी सोमानी, श्रृती भंडारी, योगीता मुथा, शंतानु संत यांनी परिश्रम घेतले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.