आर्ट ऑफ लिविंग प्राण व्यसनमुक्ती शिबिर नगर मध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्यामाध्यमातून समाजसेवेसाठी ‘प्राण’ या व्यसनामुक्ती शिबिराची निर्मिती करण्यात आली आहे, ज्याचे नगर जिल्ह्यातील केंद्रातलवकरच प्रारंभ होणार आहे.

या शिबिराच्या माहिती फलकाच्या अनावरण नुकतेच नगर मधील संस्थेच्या, ज्ञान क्षेत्रातीलसामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी (सचिव अनामप्रेम नगर) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आर्ट ऑफलिव्िंहगचे प्राण व्यसनमुक्ती शिबिराचे प्रशिक्षक कृष्णा पेंडम व जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक सदस्य उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना श्री.पेंडम म्हणाले की,  शिबिराची निर्मिती समाजाच्या आरोग्याच्या हितासाठी करण्यात आली आहे,आज देशभर व जगात सर्वत्र विविध व्यसनाचे साम्राज्य आहे ,ज्यामध्ये समाजातील तरुण होरपळून जात आहे, यामुळेकर्जबाजारीपणा वाढला आहे, माणूस आळशी व सुस्त होत आहे, हिंसाचार वाढला आहे त्याच बरोबर कौटुंबिक व सामाजिककलह निर्माण होत आहेत.

आज सर्वत्र व्यसनामुळे शरीर व्याधीग्रस्त होते व मन अस्वस्थ होते, माणसाला स्वतःच्यावास्तवाची जाणीव होत नाही व तो अकाली मृत्यूला ओढवून घेतो, या अश्या विविध प्रश्‍नांना आळा घालण्यासाठी, प. पु.श्री श्रीरवि शंकरजी यांनी हे देशव्यापी महत्वाचे पाऊल उचलले आहे, ज्याला समाजाला सर्व स्थरातून साथ मिळत आहे. नशा मुक्तभारत या अभियानाची सुरवात श्री श्री गुरुजींच्या व इतर समाजातील जेष्ठ मार्गदर्शकांच्या  उपस्थितीमध्ये या वर्षाच्यासुरवातीला पंजाब या राज्यातून करण्यात आली, ते आज देशातील बहुतेक शहरामध्ये व गावामध्ये राबवले जात आहे.

     या शिबिराच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शीत केले जाते. ज्यात योग, प्राणायाम वध्यानाच्या अभ्यास आहे. या मानव निर्मित संकटातून मनुष्य नक्कीच बाहेर पडू शकतो यावर श्री श्री चा विश्‍वास आहे.यासाठी भारतातील विविध राज्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी शिबिर प्रशिक्षक नेमले आहेत, ज्यांच्या सहकार्यातून हे शिबीर सर्वत्रहोत आहेत.

     साधक अर्बन बँकेचे मॅनेजर सतीश रोकडे यावेळी बोलताना म्हणाले की, अश्या शिबिराची आज समाजाला खूप गरजआहे, समाजाला एक नवी दिशा व आशा यातून निर्माण होणार व यासाठी सर्वोत्तपरी सहकार्याची भावना व्यक्त केली.अहमदनगर जिल्हा प्रशिक्षक समन्वयक श्री नरेंद्र बोठे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये या शिबिराचा प्रचारआणि प्रसार होणार आहे, ज्या मध्ये तंबाखू , सिगारेट, मावा, गुटखा व अश्या विविध व्यसनातून बाहेर पडण्यासाठीशिबिरार्थीना प्रशिक्षण दिले जाणार आहे, लवकरच दिनांक 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात हे अनिवासी शिबीर नगरच्याज्ञान क्षेत्र मध्ये होणार आहे, ज्याच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9422220874 – कृष्णा पेंडम व9226487181- नरेंद्र बोठे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

     संस्थेचे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री राजेंद्र पाचे व श्री चंद्रकांत तागड यांनी पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशिक्षक व आर्ट ऑफ लिविंग साधक सुनील कानडे, घनश्याम दळवी,  गणेश क्षीरसागर,वैभव वाघ सर्व स्वयंसेवकांची मोलाची साथ लाभली

Leave a Comment