विद्यार्थ्यांनी बनविलेली कार“स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल

Get real time updates directly on you device, subscribe now.

हैद्राबाद :- येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार माँडेल बद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली.

कार तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराताना भविष्यातील अव्वल निर्मिती साठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भारत घोगरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी, प्रा.मनोज परजणे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.

या बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी सांगितले कि, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल ठरली . आणि आता हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या मानाच्या देशपातळीवरील स्पर्धेत दाखल झाली आहे.

मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा.राजेंद्र खर्डे रा.निलेश मानकर, प्रा.पद्माकर काबुडकर यांचे मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागामधील सत्तावीस विद्यार्थ्यांनी ही कार तयार करण्यासाठी योगदान दिले आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी द्वितीय वर्षातील आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.