तरुणाचे कुऱ्हाडीने डोके फोडले

Get real time updates directly on you device, subscribe now.

राहुरी – राहरी तालुक्यातील डिग्रस येथील राहणारा तरुण शेतकरी अभिजीत दिलीप कोकाटे, वय २१ याला त्याच्या दूध डेअरीसमोर ९ च्या सुमारास काही एक कारण नसताना ६ जणांनी वाईट वाईट शब्दात शिवीगाळ केली.

तेव्हा अभिजीत कोकाटे हा समजावुन सांगत असताना त्याला लाथाबुक्क्याने लाकडी काठीने हातापायावर बेदम मारहाण करण्यात आली. कुऱ्हाडीने डोके फोडण्यात आले.

दगडे मारुन तलवारीने मारुन टाकण्याची धमकी दिली.

जखमी अभिजीत दिलीप कोकाटे याने काल राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी आनंद हरिभाऊ पारधे, संजय हरिभाऊ पारधे, मयूर हरिभाऊ पारधे, हरिभाऊ पारधे, अलका हरिभाऊ पारधे, राम कुंडलिक मोरे, सर्व रा . डिग्रस, ता. राहुरी यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.