२५ वर्षांत झाली नाही इतकी कामे राहुरीत केली- आ. कर्डिले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी :- तालुक्यात २५ वर्षांत झाली नाही इतकी कामे आपल्या काळात झाली असून आपण नेहमीच जनतेत असल्याने

यावेळी राहुरीतून एक लाख मते विकास कामांच्या माध्यमातून मिळविणार असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

राहुरी तालुक्यातील गुहा, वडनेर व तांदुळनेर येथे आ. कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले बोलत होते.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार,

के. मा. कोळसे, उत्तम कोळसे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, अण्णासाहेब बलमे, गोरक्षनाथ घेर आदी उपस्थित होते.

आ. कर्डिले म्हणाले, राज्यात युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून राहुरी तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.

भागडा चारी, निळवंडे कालव्यांचा प्रश्न, मदत व पुनर्वसन विभागाचा निधी आदी प्रश्न सुटण्यास मदत झाली असून

ग्रामविकास विभागामार्फत अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मोठा निधी प्राप्त झाला आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळाल्याने राज्यात अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी आमदारकी पणाला लावली, असेही त्यांनी सांगितले.

भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, अमोल भनगडे आदींची भाषणे झाली. आ. कर्डिले यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

Leave a Comment