मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील ४२ वर्षीय मनोरूग्ण पिडीत महिलेवर मंगळवारी

(दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी विनोद बन्सीलाल लोंगाणी याने बळजबरीने बलात्कार केला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद लोंगाणी (रा. शिवाजीरोड कोपरगाव)

याच्याविरुद्ध गु.र.नं. २१४/२०१९ भादंवि ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. 

Leave a Comment