ब्रेकिंग : श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांचा राजीनामा

श्रीगोंदा :- पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे या दोघांनी आज त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान श्रीगोंदा पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशावरून पंचायत समितीचे विद्यमान सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित लक्षात घेऊन पाचपुते यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान त्यांच्या जागेवर महेश हिरवे व मनिषा कोठारी यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.