धक्कादायक : अहमदनगरमध्ये टीकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत असताना तरुणाची हत्या !

शिर्डी- शिर्डी येथे हॉटेल पवनधाममध्ये काही मुले टीकटॉकवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ करत असताना गावठी कट्यातून गोळी झाडून प्रतिक उर्फ भैय्या संतोष वाडेकर यांच्या छातीत गोळी घुसून तो जागीच ठार झाला.

डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि अनिल कटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिर्डीत नाकाबंदी करुन आरोपी सनी पोपट पवार, वय २०, रा. धूलदेव, ता. फलटण, जि. सातारा याला पकडले. तसेच त्याचा सहकारी नितीन अशोक वाडेकर, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी यालाही पकडले.

सनी पवार याच्याकडे गावठी कट्टा एका राऊंडसह मिळून आला. त्याने प्रतिक उर्फ भैय्या वाडेकर याचा खून झाल्याची कबुली दिली. दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून वापर झालेल्या गोळीची पुंगळी, गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे.

इतर आरोपींचा कसून शोध सुरु असल्याचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. या घटनेची पाश्र्वभूमी अशी की, शिडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नाला रोडलगत असलेल्या हॉटल पवनधाम मध्ये मित्रांनी टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ करत असताना गावठी कट्ट्यातून गोळी झाडून शिडी येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी असलेल्या प्रतिक संतोष वाडेकर (वय १९) या युवकाचा गोळ्या झाडून खून केला.

ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संशयित चार हल्लेखोर हत्येनंतर फरार झाले असून घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तेथे धाव घेतली आहे. फरार झालेल्या एका संशयिताचे नाव नितीन वाडेका असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अन्य आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाली आहे. मंगळवार दि. ११ रोजी हटिल पवनधाम येथे सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील नितीन वाडेकर याच्याबरोबर प्रतिक वाढेकर या दोघांसह पाच जणांना खोली क्रमांक १०४ भाड्याने देण्यात आली होती.

पाचजण खोलीत जाताच हॉटेल मालक गोविंद गरुर यांना जोरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी बाहेर येवून बघितले असता तर चार जण पहिल्या मजल्यावरुन खाली उतरुन पळून जातांना दिसले. यावेळी यातील एका हल्लेखोरास गोविंद गरुर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दाम्पत्यांस प्रतिकार करत त्याने पलायन केले.

यानंतर गरुर यांनी प्रतिक संतोष वाडेकर यांस जखमी झालेल्या अवस्थेत बघून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. शिडी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.