माजी मंत्री अनिल राठोड यांना मंत्रिपद मिळणार ?

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांचा राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे वृत्त नगर स्वंतत्र या दैनिकाने दिले आहे.

या वृत्तात सांगितले आहे कि, राठोड हे सलग चार वेळा नगर शहरातून निवडून आले आहेत. मातोश्री वरून राठोड यांच्या नावाचाही विचार सुरू झाला असून, त्यांच्या समावेशास कोणतीही अडचण नसल्याचे समोर येत आहे.

गेल्या तीन – चार दिवसांपासून राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वारे वाहत आहेत. याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता, राठोड यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे सांगितले.