संभाजी कदमांकडून आमदारकीची तयारी ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केले आहे.

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

मागील विधानसभा निवडणूक शिवसेना, भाजप तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढविली होती. या चौरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी बाजी मारुन अनिल राठोड यांचा पराभव केला होता.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लेकसभा निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुजय विखे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी आता आपले लक्ष विधानसभा निवडणुकीकडे वळविले आहे.

विरोधी पक्षांनीही कुरघोड्या सुरु केल्या आहेत. दरम्यान दोन दिवसापूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी नगरची जागा भाजपने लढविण्याचा सूर लावला होता.

गेल्या चार – पाच दिवसापासून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांकडून कदम हे भावी आमदार अश्या मजकुराच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. कदम यांच्या पत्नी सुरेखा कदम या मागील अडीच वर्षे महापौर होत्या.

नगर शहरात शिवसेना उपनेते अनिल राठोड हे शिवसेनेचे सर्वेसर्वा मानले जातात, कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राठोड यांनी सलग ५ वेळा नगर शहर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात शिवसेनेने मनपा निवडणूक लढवून सर्वाधिक २४ नगरसेवक निवडून आणले आहेत. यापुर्वी महापालिकेत शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, सौ. शिलाताई शिंदे, सौ. सुरेखा कदम यांनी महापौरपद भुषविले आहे.

सेना खेरीज कोणत्याच पक्षाचे तीन महापौर झाले नाहीत. हि राठोड यांची जमेची बाजू आहे. या निवडणुकीत राठोड यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नगरमध्ये काही दिवसापुर्वी झालेल्या सभेत अनिल राठोड यांच्या उमेदवारांचे संकेत दिले होते. मात्र कदम यांच्या समर्थकांच्या सोशल लाबिंगमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Leave a Comment