पालकमंत्री राम शिंदेंच्या शब्दाला कार्यकर्त्यांनी दाखवली केराची टोपली !

Get real time updates directly on you device, subscribe now.

जामखेड :- नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीत सातपैकी एबी फार्म नसल्याने एक अर्ज बाद झाला. भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांची भर पडल्याने लढत रंगतदार होणार आहे.

सुरुवातीला भाजपतर्फे पठाण सलमा शाकीरखान यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु पक्षाचा एबी फार्म पठाणऐवजी शेख जाकीया आयुब यांना देण्यात आला. त्यामुळे पठाण यांचा अर्ज अवैध ठरला. या राजकीय खेळीमुळे एक गट कमालीचा नाराज झाला आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या शब्दाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली. शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहिणी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या वतीने शेख परवीन सिरोजद्दीन यांनी पक्षाचा एक व अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले आहेत.

मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले व छाया संतोष गुंदेचा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांनी अर्ज स्वीकारले. अर्जाची छाननी होऊन सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...