पाण्याच्या वादातून महिलेने तोडला महिलेचा कान

Get real time updates directly on you device, subscribe now.

राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.

मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ उडली आहे.

सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे संदीप दिवाकर कवाणे यांच्या शेतातील एअरवॉलजवळ महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.

याठिकाणी उषा साईनाथ शिंदे यांची मुलगी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी गेली. यावेळी तिच्याबरोबर मंगल संदीप कवाणे, संदीप दिवाकर कवाणे, शोभा प्रकाश कवाणे यांनी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.

हे भांडण सोडविण्यासाठी उषा शिंदे गेल्या असता मंगल कवाणे हिने त्यांचे केस धरून तसेच डाव्या कानातील टॉप्स जोरात ओढल्याने उषा शिंदे यांचा कान तुटून त्या जबर जखमी झाल्या. याप्रकरणी उषा शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.


Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...