कचरा डेपो आग प्रकरणी, डॉ.पैठणकर अखेर निलंबित

अहमदनगर – सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर यांना रात्री उशीरा निलंबित केले आहे.

दरम्यान तसा जिल्हाधिका-यांनी कारवाईचा प्रस्ताव मंजूर प्रस्ताव केला आहे. हा प्रस्ताव उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे पाठविला आहे.

डॉ. पैठणकर हे अनेक कारणांमुळे मनपा प्रशासनाच्या व जिल्हाधिकार्यांच्या नजरेत होते. त्यांचा मनपातील ठिसूळ कारभार, तसेच चुकीची माहिती देणे, अन सावेडी डेपोतील आग ह्या सर्व कारणांना त्यांना प्रशासनाकडून जबाबदार धरले होते. 

सावेडी येथील कचरा डेपोला अचानक लागलेल्या आगीत मनपा प्रशासनाची दोन ते तीन दिवस चांगलीच धावपळ उडाली. दोन दिवस अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.

पण ह्या आगीमुळे अनेक नागरिकाना श्वसनाचा त्रास झाला. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता.