अल्पवयीन मुलीचा विवाह लावणाऱ्या आई – वडिलावर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर  –  तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई – वडील व मुलांकडच्यांनी विवाह लावला.

याप्रकरणी काल मुलीचे वृद्ध नातेवाईक विश्न शिवराम गवळी , वय ६८, रा. अपधूप , ता. पारनेर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विकास बबन कोल्हे, विकास बबन कोल्हेचे वडील, रा. थोल्हेगाव, ता. नगर, नवनाथ कचरू गवळी, अनिता नवनाथ गवळी, दोघे रा. अपधूप, ता. पारनेर,

मुलीचे आई वडील यांच्याविरुद्ध भादवि कलम बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे सुपा पोलिसांत गुन्हा १३१ दाखल करण्यात आला असून राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पो ना शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment