बीटेकनंतर नोकरी शोधत होती ती तरुणी अचानक तिकीट मिळाले आणि बनली देशातली सर्वात तरुण खासदार !

Get real time updates directly on you device, subscribe now.

भुवनेश्वर : लोकसभेत 33 टक्के महिला खासदार पाठविण्याव्यतिरिक्त, ओडिसाने संसदेत सर्वात तरुण महिला खासदार पाठवण्याच्या विक्रम केला आहे.

25 वर्षीय चंद्राणी मर्मू अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहेत. बिजू जनता दल (बीजेडी) च्या तिकिटावर केनजर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते सभागृहात पोहोचल्या आहेत.

25 वर्षीय ही तरुणी देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार ठरली. तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून शिक्षणानंतर ती नोकरीच्या शोधात होती.

मात्र,लोकसभा निवडणुकी नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीने तिला देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार बनवले आहे.

बीजू जनता दलाने (BJD) चंद्राणी मर्मू हिला क्योंझर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहे.

निवडणुकीत मिळालेल्या या संधीचा फायदा घेत चंद्राणी यांनी विजय तर मिळवलाच. तसेच देशातील लोकसभेत एक नवा इतिहास देखील घडवला. आत्तापर्यंतची सर्वात कमी वयाची खासदार होण्याचा मान आता चंद्राणी मर्मू यांना मिळाला आहे.

आत्तापर्यंतची सर्वात कमी वयाची खासदार होण्याचा मान आता चंद्राणी मर्मू यांना मिळाला आहे.चंद्राणी मर्मू यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 67 हजार 822 मतांच्या फरकाने आपला विजय नोंदवला.

चंद्राणी यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) दोनवेळा खासदार राहिलेल्या अनंत नायक यांचा पराभव केला. काही महिन्यांपूर्वी चंद्राणी मर्मू याही अन्य तरुणींप्रमाणे एक सर्वसाधरण तरुणी होत्या.

2017 मध्ये भुवनेश्वरमधील एसओए विश्वविद्यालयातून बी. टेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्या नोकरीचा शोध घेत होत्या. तसेच स्पर्धा परिक्षांचीही तयारी करत होत्या.

चंद्राणी आपला प्रवास सांगताना म्हणाल्या, ‘मी माझे इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन नोकरी शोधत होते. मी राजकारणात येईल आणि खासदार होईल याचा मी कधीही विचार केला नव्हता.’

चंद्राणी मर्मू यांचे आजोबा हरिहर सोरेन 1980-1989 च्या काळात दोनवेळा खासदार राहिले आहेत. मात्र, चंद्राणी यांचे कुटुंब कधीही राजकारणात सक्रिय नव्हते.

Get real time updates directly on you device, subscribe now.