या महिन्यापासून होत आहेत हे पाच महत्वाचे बदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं रिझर्व्हेशन करणाऱ्यांना एक मेपासून नवी सुविधा दिली जाणार आहे. 1 मेपासून रेल्वेचा चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत प्रवाशी आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं. म्हणजे, रेल्वे रिझर्व्हेशन करताना जे बोर्डिंग स्टेशन तुम्ही निवडता, ते बदलायचे झाल्यास, चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत बदलू शकता.

2. एअर इंडियाकडून गिफ्ट : एअर इंडिया ही सरकारी विमानसेवा पुरवणारी कंपनी येत्या 1 मे पासून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. अनेकदा विमान प्रवास करणारे प्रवाशी तिकीट रद्द करतात. तिकीट रद्द केल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येतं. मात्र यापुढे एअर इंडिया प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा त्यात बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.

3. एसबीआय बँकेत होणार बदल : नवीन आर्थिक वर्षात (2019-20) देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) डिपॉझिट आणि कर्जाच्या व्याज दरात बदल करणार आहे. रिझर्व्ह बँकने (आरबीआय) दिलेल्या नव्या नियमावलीनुसार, रेपो रेटमध्ये बदल केल्यानंतर लगेचच सर्व बँकांना डिपॉझिट किंवा कर्जाच्या व्याजाची रक्कमेत बदल करावी लागणार आहे. त्यामुळे आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केल्यास याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावरील रकमेचे व्याज कमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4. पीएनबी बँकेची ही सेवा होणार बंद : पंजाब नॅशनल बँक येत्या 1 मे पासून आपले डिजीटल वॉलेट PNB Kitty बंद करणार आहे. यामुळे पीएनबी बँकने ग्राहकांना आज रात्री 12 पर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले आहे. या डिजीटल वॉलेटमधून IMPS द्वारे बँक अकाऊंटमध्ये पैस ट्रान्सफर करता येऊ शकतात.

5. सिलेंडरच्या दरात बदल : उद्यापासून स्वयंपाकघरातील सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहे. सिलेंडरचे दर वाढणार की कमी होणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल. पण या बदलामुळे याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे.

Leave a Comment