आ.संग्राम जगताप यांना पाठ केलेली इंग्रजी वाक्यही नीट बोलता येईनात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आपण लोकसभेत आवाज उठवू. संसदेत तसेच केंद्रीय मंत्र्यांबरोबर बोलताना इंग्रजी बोलावे लागेल.

विरोधी राष्ट्रवादी उमेदवाराला पाठ केलेले इंग्रजी चार वाक्य नीट बोलता येत नाही. उमेदवांराची शैक्षणिक तुलना करण्याची गरज आहे, अशी टीका भाजपचे नगर लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांनी केले.

सहकारी साखर कारखाने डबघाईला आणून राष्ट्रवादीने खासगी कारखाने उभे केले. सहकारी चळवळ संपुष्टात आणत शेतकरी विरोधी धोरण घेतले, अशी टीका भाजप-सेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केली.

पारनेर तालुक्यातील अळकुटी व जवळा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. दोन्ही सभांना विधानसभेचे उपसभापती विजय औटी उपस्थित होते.

विखे यांनी समोरचा उमेदवार व आपल्यातील फरक ओळखून मतदान करण्याचे आवाहन केले. गेल्या १० वर्षांत कांद्याला काय भाव मिळाला, आज उसाला काय भाव मिळतोय, हे पहा.

पंतप्रधान मोदींनी शेतकरी हिताची धोरणे राबवली. पाच वर्षांत विकासकामे झाली आहेत. जलसिंचन योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या. म्हणून दुष्काळाची तीव्रता कमी आहे.

ज्यांना विधानसभेत काही बोलता येत नाही ते लोकसभेत काय दिवा लावणार? असा टोलाही विखे यांनी लगावला. आपण हेलिकाॅप्टरने फिरतो असा प्रचार विरोधी उमेदवार करत आहे. पण आपण जमिनीवरचे तर, विरोधी उमेदवार जामिनावर आहे, हे जनतेला माहिती आहे.

सोशल मीडियावर खासदार झाल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात व लाल दिव्याची गाडी दाखवतात. पण चार महिन्यांपूर्वी विरोधी उमेदवार पिवळ्या दिव्याच्या गाडीत बसला होता, याचाही फोटो कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध करावा, असे विखे म्हणाले.

Leave a Comment