माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षशिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातून हकालपट्टी केली.

आता त्यांच्या पदरात भाजपकडून दान म्हणून टाकलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.

त्यामुळे वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा अकोले तालुक्यात वाकचौरे यांना फिरायला बंदी घालू, असा इशारा भाजपच्या युवा मोर्चाने पत्रकातून दिला आहे.

वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. नंतर शिवसेनेने पहिल्या यादीत त्यांचे नाव उमेदवार म्हणून समाविष्ट केलेले असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र करून २०१४ मध्ये त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

नंतर शिवसेनेने पहिल्या यादीत त्यांचे नाव उमेदवार म्हणून समाविष्ट केलेले असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र करून २०१४ मध्ये त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

ऐनवेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सदाशिव लोखंडे यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने त्यांना पराभूत व्हावे लागले.

नंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून ते काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून पराभूत झाले. आता या वेळी कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने ते बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करत आहेत.

Leave a Comment