मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार ?

अहमदनगर :- कुटुंबातील मी थोरला मुलगा असूनही वडील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी मंगळवारी केला.

राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत विखे बोलत होते. नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले.

मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार? असा सवालही विखे यांनी केला. शरद पवार हे व्यासपीठावर असतानाच विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप केले हे विशेष.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचे काका अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली. 


728 X90 Jeep Car