अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.

अहमदनगर :- जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा ज्वर वाढू लागला आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ३३ संशयीत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांवर तातडीने उपाय करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठ ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे,

साबणाने स्वच्छ हात धुवावेत, भरपूर पाणी प्यावे, पालेभाज्यांसह पौष्टिक आहार घ्यावा, धूम्रपान टाळणे आदी सूचना देण्यात येत आहेत. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

नुकतीच जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. स्वाइन फ्लू नियंत्रणाचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे.