…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.

त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.

केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.728 X90 Jeep Car