छगन भुजबळ यांची श्रीगोंद्यात सभा.

श्रीगोंदे :- माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची सभा १५ ला श्रीगोंद्यात होणार आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती विकास आघाडी, आरपीआय कवाडे गट व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता संत शेख महंमद महाराज पटांगणात ही सभा होणार आहे,

अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली. दरम्यान, श्रीगोंद्यात आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून प्रचारास वेग आलेला आहे.