पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली. 

पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे.

सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही.

हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.

पाण्याचा टँकर नियमित येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. जगताप म्हणाले, खोटारड्या लोकांनी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला. 

नुसत्याच योजनांच्या घोषणा केल्या, पण अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षांत नोटबंदी, आरक्षण, कर्जाच्या समस्यांमुळे सर्वांना खूप त्रास झाला.

Leave a Comment