विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश?

अहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. 

त्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून  डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही विखेंच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल आहेत.

तसेच पुत्र सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पक्षात त्यांची होणारी घुसमट जगजाहीर आहे. 

शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस चे उमेदवार  भाऊसाहेब कांबळे यांच्या पोस्टर वर स्टार प्रचारक असलेल्या राधाकृष्ण विखे यांचा फोटो नसल्याने एकाच खळबळ उडाली. 

सुजय  विखे यांच्या प्रवेशापूर्वी जिल्हा भाजपा पदाधीकार्याना कोनातीच कल्पना नव्हती.

आणि आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबत पण आजूनही कोणत्याच पदाधीकार्याना काहीच कल्पना नसल्याचे समजते.