माजीमंत्री पाचपुतेंचे कुकडीच्या आवर्तनासाठी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांना साकडे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा :- सध्या दुष्कळाची धग वाढत आहे. या परिस्थितीत शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी कुकडी आवर्तन अत्यंत महत्वाचा घटक ठरू शकतो.

मात्र फळबागा जळण्यापूर्वीच पाणी सुटले पाहिजे. कुकडीचे आवर्तन लवकर न सुटल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

या सर्व गोष्टींचा विचार करता दि.१ एप्रिल पासून कुकडीचे आवर्तन सोडावे. अशी आग्रही मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना या संदर्भात पाचपुते यांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनासाठी दि.२ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे बैठक झाली.

डिंभे उजवा कालवा व मीना पूरक कालव्याला दि.५ मार्च २०१९ पासून आवर्तन सोडण्यात आलेले आहे.

यामध्ये ठरल्याप्रमाणे पाणी वापरण्याऐवजी वरच्या भागातील काही लोकांनी पाण्याचा जास्त वापर केला आहे. पुणे जिल्ह्यात पाणी जास्त वापरल्याने पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे.

त्यामुळे माणिकडोह धरणातील पाणी पोलिस बळाचा वापर करून तातडीने काढून येडगाव धरणात आणून दि.१ एप्रिल पासून आवर्तन सोडावे.

आवर्तन न सोडल्यास कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यात अंत्यत गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.

बैठकीत ठरल्या प्रमाणे नियोजन होत नसल्यामुळे खालच्या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होईल

Leave a Comment