खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नगर : मोक्का व खून प्रकणातील फरार आरोपी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केला. लोकेश परशुराम माने (२७, रा. कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत. 

बारामती शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती, तेव्हापासून आरोपी लोकेश फरार होता. 

पुणे जिल्ह्यातील मटका व्यवसायिक कृष्णा महादेव जाधव याचा खून करून आरोपी लोकेश फरार झाला होता. हा आरोपी नगर शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली.

त्यानुसार कायनेटिक चौकात सापळा रचून आरोपीला पाठलाग करत पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. 

पोलिस अधीक्षक ईशू सिंधु व अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके हे स्वत: कारवाईसाठी हजर होते.

728 X90 Jeep Car