अटक वॉरंट असलेले गडाख पोलिसाना आढळले नाहीतच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नेवासे: शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख व माजी आमदार शंकरराव गडाख यांना पकड
वॉरंट काढून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांना दिले होते. 

त्यानुसार आज ( शनिवार ) पोलिसांनी गडाख यांच्या नगर व सोनईमधील घरांची झडती घेतली. मात्र शंकरराव गडाख दोन्ही ठिकाणी मिळून आले नाहीत.

दरम्यान शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला नगर पोलिसांसह जिल्हाबाहेरील सुमारे २५० पालिसाचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेतक-यांच्या प्रश्नांना नेवासा तालुक्यातील बडाळा बहिरोबा येथे सन २०१७ मध्ये शंकरराव गडाख यांनी चक्काजाम आंदोलन केले होते.

त्यांना आज ( शनिवार ) न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांना बजावले होते.

Leave a Comment