लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली.

अहमदनगर :- मनपा निवडणुकीपासून चर्चेत असलेली शहर काँग्रेसमधील गटबाजी आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळली आहे.

काँग्रेसमधील विखे-थोरात गटाच्या फुटीचा परिणाम म्हणून या गटबाजीकडे पाहिले जात असले तरी या गटबाजीने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

शहर काँग्रेसमधील विखे-थोरात गटांपैकी आता केवळ थोरात गटाचेच समर्थक राहिल्याचे सांगितले जाते.

विखे समर्थकांनी सुजय यांच्यासमवेत राहणे पसंत केल्याचेही बोलले जात आहे. अशा स्थितीत थोरात समर्थकांमध्येच पदांसाठीची रस्सीखेच रंगात आल्याने ती चर्चेची झाली आहे.

728 X90 Jeep Car