फेक फेसबूक अकाउंट बनवून मुलीचे लग्न मोडले !

अहमदनगर :- लग्न जमलेल्या तरुणीचे फेसबूकवर बनावट अकाउंट तयार करून लग्न जमलेल्या तरुणाशी संवाद साधून लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी बीड जिल्ह्यातील निमगावदेवी येथील तरुण वैभव गहिनीनाथ फाळकेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी भिंगारमधील तरुणीने फिर्याद नोंदविली आहे. २१ वर्षीय तरुणीचे भिंगारमधील एका तरुणाशी लग्न जमले होते.

परंतु, मुलीच्या ओळखीच्या असलेल्या तरुणाने मुलीचे बनावट फेसबूक अकाउंट उघडले होते. या फेसबूक अकाउंटवरून लग्न जमलेल्या मुलाशी चॅटिंग केले.

तसेच मुलीचे व त्याचे फोटो लग्न जमलेल्या मुलाला पाठविले. त्यामुळे मुलीचे लग्न मोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला.

728 X90 Jeep Car