….तर सुजय विखे VS संग्राम जगताप फाईट होणार !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरचं राजकारणच पालटलं आहे. 

सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर होताच,
सुजय विखेंविरोधात निवडणूक कोण लढवणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

दरम्यान विद्यमान विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप आणि त्यांचे सुपुत्र संग्राम जगताप. या दोघांपैकी एकाला नगरमधून लोकसभेसाठी उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभेचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेचं तिकीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस नगरमध्ये मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे. 

संग्राम जगताप हा नगरमधील तरुण चेहरा आहे. त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.

महत्त्वाचं म्हणजे नगरचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं ते भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. 

महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी सासरे शिवाजी कर्डिलेंच्या भाजपला मदत केली होती. त्याची परतफेड शिवाजी कर्डिले करु शकतात.

संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली तर नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा दोन तरुणांचा सामना होऊ शकतो.

अशावेळी शिवाजी कर्डिले हे लेकीच्या नवऱ्याला मदत करणार की काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना मदत करणार असा प्रश्न असेल.

728 X90 Jeep Car