अहमदनगर मध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी भाजपच्या माध्यमातून एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघात पूर्वीसारखीच संघर्षाची स्थिती असून १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे भाकीत वर्तवले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संवाद साधला.

बूथ अध्यक्ष, तालुकाध्यक्षांशी चर्चा करताना पवार म्हणाले, उत्तम सहकारी असताना स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराला डावलून बाहेरून उमेदवार घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही.

त्यामुळे जाणीवपूर्वक नगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ठेवला. नगर शहर व श्रीगोंदे या दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

अन्य मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.

कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा व मतदारांचा आदर राखण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीकडेच ठेवण्याची भूमिका मी घेतली. १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, अशी स्थिती नगरमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

728 X90 Jeep Car