जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिवाजी कर्डिले ‘किंगमेकर’

राहुरी :- डाॅ. सुजय विखे यांना भाजपत घेण्यात किंगमेकर ठरले ते आमदार शिवाजी कर्डिले. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी डाॅ. विखे यांना भाजपत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते. 

तुम्ही भाजपत आलात, तर खासदार झालात म्हणून समजा, घाटावर रहायला या असे ते म्हणाले होते. सुरुवातीला डाॅ. विखे आपण अपक्ष उमेदवार आहोत, असे सांगत होते. 

मात्र, राहुरीत हुकूमी मते हवे असतील, तर डाॅ. विखेंना भाजपमध्ये आणावे लागेल. तसे झाल्यास राहुरी आपोआप पाठीशी उभी राहिल, हे ओळखून कर्डिले त्यांना तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, असे सांगत होते.

मनपात आपण महापौर भाजपचा करुन दाखवला आणि आता डाॅ. सुजय यांच्या रुपाने विखे घराण्यातील नवीन पिढी भाजपत आणली, असे म्हणत कर्डिले यांनी विधानसभेची आपली वाट सुखकर करून घेतली. 

728 X90 Jeep Car