डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी नकोच !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे. 

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विखेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

त्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी नगर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर तब्बल चार वेळा चर्चा केली. चर्चेत कार्यकर्त्यांनी डॉ. सुजय यांनी भाजप व मोदी यांच्या विरोधात केलेल्या भाषणांचे पुरावे देखील पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्याचे वृत्त आहे. 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार दिलीप गांधी यांना तातडीने मुंबईला बोलावून घेण्यात आले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खासदार गांधी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.

728 X90 Jeep Car