सुजय विखेंच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी अस्वस्थ !

अहमदनगर :- डॉ सुजय विखे यांचे संभाव्य भाजप प्रवेशाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असतानाच , खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनतर आता ते मुंबईत आले आहेत.  

येत्या दोन दिवसांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिलं यादी जाहीर होणार आहे. या यादीत आपल्या नावाच्या समावेशासाठी खा . गांधी हे दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.

डॉ . विखे यांचा मंगळवारी भाजप प्रवेश निश्चित झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला न सोडल्याने नाराज झालेल्या डॉ . विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी करण्याचा घाट घालत आहे. 

डॉ. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर शनिवारी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत ते दोन दिवसांपासून तळ ठोकून होते.

दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या सर्व राजकीय घडामोडीनंतर सोमवारी रात्री गांधी मुंबईत दाखल झाले.

दरम्यान खा गांधी हे तीन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. विद्यमान खासदार असून पुन्हा उमेदवारीसाठी जोरदार तयारी चालविली आहे पक्षाच्या पहिल्या यादीत आपले नाव येण्यासाठी गांधी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू आहे.

728 X90 Jeep Car