खा.गांधी समर्थकांच्या घोषणाबाजीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष !

अहमदनगर :- दिलीप गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’…’दिलीप गांधी झिंदाबाद’…अशा जोरजोरात सुरू असलेल्या घोषणांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुर्लक्ष केले. 

यामुळे नगरचे भाजपचे खासदार गांधी यांचे समर्थक अस्वस्थ झाले. पण मुंबईत गांधी समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे मात्र राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला. 

दरम्यान, दुपारी फडणवीस यांनी घोषणाबाजांची भेट घेऊन नगरच्या उमेदवारीबाबत सारे काही तपासून निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले जाते.

गांधींनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी करण्यासाठी नगरमधील व दक्षिण नगर जिल्ह्यातील गांधी समर्थक मुंबईला गेले होते. 

पक्ष कार्यालयात फडणवीस येत असताना काही उत्साही मंडळींनी जोरदार घोषणाबाजी केली. पण फडणवीस यांनी त्याकडे चक्क दुर्लक्ष करून ते आत बैठकीसाठी गेले.

728 X90 Jeep Car