लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब ?

जगताप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

अहमदनगर :- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या नगर दक्षिणच्या जागवेरुन तिढा कायम असून आता पुन्हा अरुण काका जगताप यांचा नावाची चर्चा सुरु आहे.

निवडणूका जाहीर होण्या अगोरदच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नगर दक्षिणच्या जागवेर चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे.

नगर दक्षिणच्या जागेसाठी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती.

त्या चर्चेला काही दिवसात पुर्णविराम मिळाला होता. तर त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भोवतील संपूर्ण चर्चा रंगत चालली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.

यातुन पुन्हा एकदा नगर दक्षिणासाठी अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असून जगताप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

येत्या दोन दिवसांत नगरच्या जागेवर निश्चित उमेदवार कोण हे ठरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

जगताप यांच्या नावावर एकमत झाल्यास निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या ताब्यात असलेला दक्षिण भाग राष्ट्रवादीला ताब्यात घेण्यात यश येईल अशी शक्यता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलत आहेत.

अरुणकाका जगताप यांच्या सारख्या तडफदार, मनमिळावू, शांतताप्रिय व युवकांना मार्गदर्शक असलेले काका यांची उमेदवारी निश्चित झाली तर याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील निवडणुकांमध्ये होईल.

व नगर जिल्हयात जास्तीत जास्त उमेदवार निवडूण येतील असा विश्वासही कार्यकर्ते चर्चेत करत आहेत.

नगर दक्षिण जागेसाठी विखे पाटील तयारी करत असले तरी त्यांना हातात घड्याळ घेतल्या शिवाय त्यांना उमेदवारी करता येणार नाही.

आणि तुर्ततरी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर जातात की नाही ही शक्यता तशी धुसरच असल्याने नगर दक्षिणच्या जागेवर जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार यांचा निर्णय अंतिम मानला जातो. यामधुनच आता राष्ट्रवादीने आपला उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असून आज आमदार अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

728 X90 Jeep Car