उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ !

कार्यक्रम ठिकाणच्या खुर्च्या रिकाम्याच...

अहमदनगर :- कार्यारंभ आदेश नसलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज भूमिपूजन झाले.

यावेळी खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे,खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आ संग्राम जगताप,आ.अरुणकाका जगताप,व जिल्ह्यातील इतर सर्वच आमदार अनुपस्थित होते.

विशेष म्हणजे जिल्हाभरातील वृत्तपत्रात आणि सोशल मिडीयावरही जाहिरातबाजी करूनही राजकीय नेते आणि भाजपच्या कार्यकर्त्यानीही ह्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

जिल्ह्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. कार्यक्रम ठिकाणांच्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर फक्त राजकीय श्रेय लाटण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गांधी यांनी सदर कामाचे भूमिपूजनाचा घाट घातला आहे.

728 X90 Jeep Car