लोकसभेसाठी मोनिका राजळेचां खा. दिलीप गांधीना पाठिंबा.

विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची इच्छा.

पाथर्डी :- ताई, तुम्हाला लोकसभेसाठी शुभेच्छा मतदारांमध्ये तुमची इमेज खूप चांगली आहे. लोकसभा, विधानसभा सगळीकडे वातावरण चांगले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पालवे म्हणताच आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभेची इच्छा नाही, मी आहे तेथेच बरी आहे. राजकारणात मी नवीन आहे, अजून शिकू द्या, असे सांगत लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत नसल्याचे सांगत विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची इच्छा बुधवारी बोलून दाखवली.

खासदार दिलीप गांधी यांना त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला. माधवराव निऱ्हाळी खुल्या नाट्यगृहात सुमारे आठ कोटींच्या विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. गणेशोत्सव स्पर्धेतील देखाव्यांचे पारितोषिक वितरण व पालिका हद्दीतील बचत गटांना कर्ज वितरणही या वेळी झाले. मोठे शक्तिप्रदर्शन करत राजळे गटाने तालुक्यातील त्यांच्या ताब्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते निमंत्रित केले होते.

आमदार राजळे म्हणाल्या, मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्र्यांनी पालिकेला विशेष बाब म्हणून भरीव निधी दिला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची बहुतांशी पूर्तता झाली असून आगामी काळात मोठा निधी आणून व्यापारी गाळे, सुधारित नळपाणी योजना, तसेच पर्यटनाची कामे केली जातील. पुन्हा एकदा केंद्रात व राज्यात भाजपला सत्ता मिळणार आहे. विकासकामे करताना राजकीय मतभेद दूर ठेवले. पंतप्रधान आवास योजनेची सर्वाधिक कामे पाथर्डी पालिकेत झाली आहेत.

728 X90 Jeep Car