अनुराधा नागवडेंच्या उमेदवारीस काँग्रेसच्याच नेत्यांचा विरोध

सुजय विखे यांच्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा

श्रीगोंदे :- नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यास तालुक्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा विरोध असून ते डॉ. सुजय विखे यांच्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने शरद पवार व अजित पवार यांनी मागील आठवड्यात नागवडे यांना प्रचाराला लागा, असे सांगितल्याने नागवडे समर्थकांचा जनसंपर्क दौरा सुरू झाला.

१ मार्चला नागवडे यांचा मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. मात्र, तो होऊ शकला नाही.

त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल काकडे, सुभाष डांगे यांनी 

नागवडे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करून डॉ. विखे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पवारांकडे केल्याचे समजते.

नागवडेंविरुध्द विखे समर्थक एकवटले असून विखेंना उमेदवारी दिल्यास आम्ही श्रीगोंद्यातून मोठे मताधिक्य देऊ असे ते सांगतात.

दरम्यान, भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचा गट शांत आहे. नेते जो उमेदवार देतील, त्याचे काम प्रामाणिकपणे करून मताधिक्याने निवडून देऊ, असे कार्यकर्ते सांगतात.

728 X90 Jeep Car