आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला !

केडगाव हत्याकांडात त्यांच्या मुलीवरच आता आरोपी होण्याची वेळ.

अहमदनगर :- शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला आहे.

केडगाव हत्याकांडात त्यांच्या मुलीवरच आता आरोपी होण्याची वेळ आली आहे. नातेवाइकांमध्ये भांडणे लावणाऱ्या कर्डिले यांना येत्या विधानसभेला धूळ चारण्यासाठी मी सज्ज झालो आहे.

सर्वांनी मला साथ द्यावी,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली. तालुक्यातील आडगाव येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, संदेश कार्ले, अनिल कराळे, अमोल वाघ, एकनाथ झाडे, दत्तू कोरडे, दिगंबर कराळे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

या वेळी शशिकांत गाडे म्हणाले, ‘शिवाजी कर्डिले यांनी नगर येथील जगताप, कोतकर व गाडे कुटुंबात भांडणे लावण्याचा उद्योग केला आहे. माणसात माणसे न ठेवण्याचे काम ते करीत आहेत.

भाग्यश्री मोकाटे यांचा कोणताही दोष नसताना त्यांना दारूकांडात गुंतवण्याचे काम कर्डिले यांनी केले आहे. अनेक निवडणुकीत युतीचा धर्म पाळत आम्ही कर्डिले यांना मदत केली.

मात्र, त्यांनी आम्हाला फसवण्याचे काम केले आहे. मी नगर, श्रीगोंदा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्या वेळी कर्डिले यांनी, ‘तुम्ही मला राहुरी मतदारसंघात मदत करा,’ अशी विनंती केली होती.

मात्र, कर्डिले यांनी मला मदत न करता बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्याशी संधान साधून आपले उखळ पांढरे करून घेतले होते. येणाऱ्या विधानसभेला एखाद्या खमक्या उमेदवाराच्या पाठिशी राहून आपण कर्डिले यांना पराभूत करणार आहोत.

तुम्ही माझ्या पाठिशी रहा. येणाऱ्या विधानसभेला त्यांना घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची टीका त्यांनी केली.

728 X90 Jeep Car